
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) कर्नाटकमध्ये भाजप आणि जनता दल सेक्युलर यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची चर्चा सुरु असून केंद्रीय नेतृत्व त्यावर अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा (BS Yeddyurappa) यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यासंदर्भात निर्णय घेतली, अशे सांगून येडियुरप्पा म्हणाले की, जागावाटपाचा निर्णय हा केंद्रीय नेत्यांवर सोडला आहे. येडियुराप्पा २०२४ च्या लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात २५-२६ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी राज्यभर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली असली तरी मोदींसमोर ते शून्य आहेत. मागीलवेळी मिळाल्या तेवढ्याच जागा २०२४ मध्येही मिळतील व मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असेही येडियुरप्पा म्हणाले.