पाहिलाय का तुम्ही बकऱ्यांचा फॅशन शो !

0
22

 

अकोला- आजवर तुम्ही अनेक फॅशन शो पाहिले असतील. मात्र बकऱ्यांचा कधी फॅशन शो पाहिलात का? अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात जेसीआय संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून दरवर्षी 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान जेसीआय सप्ताहाचे आयोजन केले जाते. अकोटमध्ये जेसीआयकडून ‘बकरी फॅशन शो’ आयोजित करण्यात आला होता. बिलबिले मंगल कार्यालयाच्या मैदानावर अनेक बकऱ्यांनी ‘मॉडेल’ म्हणून रॅम्प वॉक केला. या आगळ्यावेगळ्या फॅशन शोचे आयोजन असल्यामुळे अकोट शहरात तसेच अकोट तालुक्यातील शेळी पालकांनी अतिशय सुंदररीत्या आणि उत्साहात सहभाग घेतला. या फॅशन शोमध्ये तालुक्यातील 60 हून अधिक बकऱ्या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे बकरीचे रॅम्प वॉक घेत सर्व बकऱ्या अतिशय नटून थटून सर्व शेळी पालक घेऊन आले होते. यात प्रत्येकांनी अनेक सामाजिक संदेश देत ठुमकत ठुमकत प्रत्येक बकरीने रॅम्प वॉक करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. बघण्यासाठी अकोटकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
बकरी कधी ‘सौंदर्यवती’ बनून रॅम्प वॉक करू शकते का?… असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण
डौलदार चाल, पायात पैंजण, गळ्यात माळा, डोक्यावर टोपी…शृंगारानं सजलेली ही मॉडेल पाहा… दुसरी तिसरी कोणी नसून ही बकरी आहे.
या फॅशन शो मधे तृतीय क्रमांक गणेश पारवे , द्वितीय क्रमांक मंगेश नाथे तर प्रथम क्रमांक प्रमोद दिंडोकार यांना जाहीर करण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा