आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सुनावणी सुरु

0
22

मुंबई-शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीला आज विधान भवनात सुरु झाली आहे. (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ सदस्यांची सुनावणी पार पडत असून त्यासाठी दोन्ही गटांचे आमदार विधान भवनात दाखल झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील तब्बल ३४ याचिकांवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे. सुनावणी पार पडत सर्व आमदारांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सेंट्रल हाॅलमध्ये सर्वांना मागील बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचिकेप्रमाणे संबंधित आमदारा आणि त्यांच्या वकिलांना पुढे बोलावून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी आजच निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने देखील या सुनावणीला कसे सामोरे जायचे? याचे नियोजन केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा