आशिया चषकमध्ये आज श्रीलंका-पाकिस्तान आमनेसामने

0
26

कोलंबो- क्रिकेटच्या आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार असून कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल व त्याचा मुकाबला भारताशी होईल. त्यामुळे श्रीलंका जिंकल्यास पाकिस्तान बाहेर पडेल व भारत आणि श्रीलंका असा फायनल सामना होईल. मात्र, पाकिस्तान जिंकल्यास क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान फायनलचा थरार अनुभवायला मिळेल. दरम्यान, सामन्यावर पावसाची टांगती तलवार आहे.

यजमान श्रीलंकेला नमवून भारताने अंतिम फेरी गाठली आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन गुण असून जिंकणाऱ्या संघाचे ४ गुण असतील. भारताने याआधीच 4 गुणांसह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास श्रीलंकेचा संघ अंतिम सामना खेळेल. कारण त्यांचा रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. गुरुवारी कोलंबोमध्ये पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यावर पावसाची टांगती तलवार राहणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा