100 कोटीचा दावा कुणावर करणार आ. यशोमती ठाकूर ?

0
20

 

अमरावती : लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी नवनीत राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी कडक- कडक नोटा घेतल्याचा आरोप केल्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या असून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर राणा दाम्पत्या विरोधात 100 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार आहेत. ठाकूर म्हणतात,नोटा वाटतं असताना ईडी कुठे गेली. उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का , असा सवाल आता यशोमती ठाकुर यांनी केला.मागच्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांनी पैसा वाटला होता त्याचा सुद्धा मागच्या प्रशासनाने देखील रिपोर्ट पाठविला आहे. त्यांनी अतिरिक्त खर्च केलेला आहे. याचा देखील रिपोर्ट गेला आहे. असतांनाया सगळ्या गोष्टींना लपविण्याचे काम उपमुख्यमंत्री करतात. राणा दाम्पत्यावर वकीलामार्फत कायदेशीर कारवाई करणार, निवडणूक विभागाकडेही तक्रार करणार असा आरोप आमदार यशोमती ठाकूर
यांनी केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा