प्रश्न विचारण्याचा अधिकार काॅंग्रेसला नाही! सुधीर मुनगंटीवार

0
31

 

नागपूर : काँग्रेसने मराठवाड्याच्या जनतेला विकास म्हणून काहीही दिलं नसताना त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? आम्ही न्याय देण्यासाठी निघालो तेव्हा संशय घेतला जातो. वैधानिक विकास मंडळ गुंडाळणाऱ्या काँग्रेसने मराठवाड्याच्या जनतेकडे जाऊन माफी मागितली पाहिजे असे प्रतिपादन त भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या आग्रहातून मराठवाडा विकासासाठी ही बैठक होत आहे. काँग्रेसने सत्तेसाठी फक्त मराठवाड्यात दौरे केले आणि खुर्ची एके खुर्ची एवढेच काम केले आहे. यांना स्वप्नातही खुर्ची शिवाय काही दिसत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संदर्भात संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना

मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये अमित शहा होते का, असे बॅनर लावण्यात आले आहे.. त्यावर बोलताना मग उद्धव ठाकरे त्यावेळेस होते का असा प्रति प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. कदाचित त्यांचा पुनर्जन्म झाला असं म्हणत असतील. राहुल गांधी तिरंगा झेंडा फडकवतात मग त्यांचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी काही संबंध आहे का.. असे बोलणें आश्चर्यकारक आहे. काही लोक विषारी शब्दाचा उपयोग करतात असा टोला संजय राऊत यांना मुनगंटीवार यांनी लगावला.
खरेतर इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही. ते बैठकीत राहुल गांधीच्या लग्नाची चर्चा करतात, मुख्यमंत्र्याचा हात पकडून इकडून तिकडे पाठवतात. कुणाला खुर्ची मिळत नाही त्याच्यातून रुसवे फुगवे होतात. त्यांच्याकडे देश हिताचा कार्यक्रम नसून, देशाला मागे नेण्याचेच ते काम करत आहेत. यांना कामधंदे नाही जनतेचा हिताचा विचार नाही. केवळ पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर यांची नजर आहे. दरम्यान, मराठा आंदोलन संदर्भात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले,
चंद्रपुरात पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये संवादातून प्रश्न सुटतात, आरक्षणाच्या बाबतीत संविधानाच्या चौकटी बाहेर सरकार म्हणून कोणतीही कृती करणार नाही… प्रश्न हे संवादातून सुटणार आहेत. खरेतर अजून कृती झालेली नसताना उपोषण करण्याची गरज नाही. यावर संवाद आणि चर्चा सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोणावर अन्याय होणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.
नाना पाटेकर यांनी कुठलीही टीका केली नाही त्यांनी मला फोन करून सांगितलं मी अभिनंदन करतो. ट्वीट मध्ये लोकांनी हा देश लुटला त्याविरुद्ध कृती अपेक्षित आहे असे म्हटले असून त्यांनी सरकारवर टीका केली नाही तुम्हाला अर्थ समजला नसेल तर त्यांना विचारू शकता असे सांगितले.
वाघ नखांची प्रतिकृती याविषयीच्या शंका संदर्भात बोलताना असा प्रश्नही विचारने मला वाटतं हे आश्चर्यजनक आहे. प्रतिकृती ही आपल्या देशातच तयार करता आली असती
त्यासाठी लंडनला जाण्याची गरज नाही. विरोधी पक्षाच्या सुपीक डोक्यातून नापीक आयडिया निघतात त्याचेच आश्चर्य वाटत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा