मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटींच्या घोषणा

0
12

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे ५९ हजार कोटींच्या विकासकामांचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सुमारे १४ हजार कोटींच्या नदी जोड प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे 14 हजार 40 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. तहानलेल्या मराठवाड्याला या प्रकल्पांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीसाठी 284 कोटी, संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यास 188 कोटी तसेच पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यास 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ठाकरेंनी वॉटर ग्रीडचा खून केला-फडणवीस

दरम्यान, आमच्या काळात राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प पुढे आणला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या सरकारच्या कालावधीत सरकारने मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाचा मुडदा पाडला, असा थेट आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णायांची व त्याच्या अंमलबजावणीचीही माहिती दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा