जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेत मोदीच अव्वल

0
13

जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे अव्वल ठरले आहेत. जागतिक नेत्यांच्या नव्या रेटिंगच्या यादीत मोदी पहिल्या स्थानावर असून त्यांना ७६ टक्के रेटींग मिळाली आहे तर त्यांच्या खालाखोला स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट हे ६४ टक्के रेटींगसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती देण्यात आलीय.
रेटींगची ही यादी डिसिजन इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने जारी केली आहे. या यादीनुसार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ४८ टक्क्यांच्या मान्यता रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे ४० टक्के रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक २७ टक्के रेटिंगसह १५ व्या स्थानावर असल्याचे यादीत नमूद करण्यात आले आहे. यावर्षी जूनमध्येजाहीर करण्यात आलेल्या मान्यता रेटींग यादीतही मोदी अव्वल स्थानावर होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा