
आपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ वर्षभर विविध सामाजीक, धार्मीक, सांस्कृतिक, शैक्षणीक व धर्मादाय इ. कार्यक्रमाचे आयोजन करीत असते उदा. हिंदू नववर्ष, राम नवमी, गीतरामायण दिवाळी उत्सव, हनुमान जयंती, संगीत क्षेत्रातील विविध गायक कलाकारांचे सुगम संगीताचे कार्यक्रम, विविध व्याख्यानमालांचे आयोजन, सर्व थोर पुरूषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, गरजू विद्र्याथ्यांना शैक्षणीक मदत करीत असते.
महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे एक उत्साहाचा, अपुर्वाईचा उत्सव, त्यातही नागपुरातून तर या उत्सवाला आनंदाचे उधाण येते. या उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ मोठया हिरीरीने सहभागी झाले आहे. या गणेशोत्सवाची सुरूवात मंडळाच्या वडीलधा-या मंडळींनी 1958 साली करून सामाजीक बांधीलकीचा पाया रोवला व त्यांचा उ¬द्देश लक्षात घेऊन मंडळाच्या सर्व पुरूष व महिला कार्यकर्ते ही परंपरा मोठया उत्साहात पुढे नेत असून दिवसेंदिवस गणेशोत्सवाच्या व्यतिरीक्त विविध सामाजीक, सांस्कृतीक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करीत असते.
गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने विविध विषय, संकल्पना, प्रस्तुतीकरण, व संस्कृतीचे जतन करून पौराणिक कथा, देशभक्तीपर देखावे व देशातील विशेषतः महाराष्ट्रातील जगविख्यात संत व देव-देवतांच्या मंदिरांची प्रतिकृती तयार करण्यात मंडळ अग्रणी असते. गेल्या पंधरा वर्षांपासुन नागपूरचेच नव्हे तर संपुर्ण विदर्भाचे भुषण वाटावे अशी मंडळाने आपली ख्याती निर्माण केलेली आहे. मंडळाने यापूर्वी संत श्री गजानन महाराज मंदिर, शेगाव, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, जंग आझादीकी (1857 च्या संग्रामावर आधारीत देखावा) श्री साईबाबा मंदिर शिर्डी, तिरूपती बालाजी मंदिर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट, आद्य ज्योतिर्लिंग मंदिर त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानी मंदीर तुळजापुर, सप्तश्रृंगी देवी मंदीर नाशिक, श्री खंडोबा मंदिर जेजुरी, श्री श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर पीठापुरम, श्री योगेश्वरी देवी मंदिर, अंबेजोगाई, महाकालेश्वर मंदिर, उज्जैन, शारदादेवी मंदिर, मैहर, अष्टविनायक दर्शन, श्री बाॅंकेबिहारी मंदिर, वृंदावन, उत्तरप्रदेश इत्यादी सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून नागपूरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात एक आपली विशेष व आगळीवेगळी ख्याती व ओळख निर्माण केलेली आहे. जवळपास 3 लाखांच्या वर भावीक मंडळाच्या या उत्सवाला दहा दिवसात भेट देतात
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाला मुर्ती, सजावट, विषय, संकल्पना व एकूण सर्व व्यवस्था यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालय, नागपूर तर्फे ‘आदर्श गणेशोत्सव’ स्पर्धेचा नागपूर शहरातून प्रथम पुरस्कार प्राप्त होत असून विविध संस्थांद्वारे सुद्धा मंडळाचा गौरव करण्यात येतो.
श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ दरवर्षी विविध संकल्पना व विविध सुप्रसिध्द मंदिरांच्या प्रतिकृती, तेथील पुर्व संस्कृती, पंरंपरा व धार्मीक वातावरण तयार करून लोकांसाठी एक वेगळेपण प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत असते.
यावर्षी श्री मीनाक्षी मंदिर, मदुराई, तामिळनाडू या सुप्रसिध्द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकार करण्यात आली आहे. श्री मीनाक्षी देवी ची सकाळी व संध्याकाळी होणारी पारंपारिक आरती, रोज होणारा श्रृंगार, गोंधळ, आरती, प्रसाद, भोग तसेच मीनाक्षी देवीच्या साक्षात दर्शनाचा लाभ नागपूरकरांना नागपूरातच व्हावा हा उद्देश्य घेवून मंडळाने श्री मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा मानस केलेला आहे. श्री मीनाक्षी देवीच्या दर्शना सोबतच तेथील प्राचीन इतिहास, परंपरा, संस्कृती, पुजापाठ, प्रसाद वितरण व आपण मदुराईला येवून साक्षात श्री मीनाक्षी देवीचेच दर्शन घेत आहोत असे हुबेहुब वातावरण नागपूरातच तयार करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मीनाक्षी मंदिरात होणारी रोज आरती व प्रसाद येथे सुद्धा सकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे. श्रींच्या व मिनाक्षी देवीच्या आगमनाच्या दिवशी सर्व महीला व पूरूष कार्यकर्ते दक्षीण भारतीय परंपरागत वेशभुषेमध्ये मिरवणुकीत सम्मीलीत होतील. नागपूरातील अग्रगण्य शिवमुद्रा व गजवक्र ढोलताशा पथकाच्या जवळपास 500 वादकांच्या गजरात श्रींचे भव्य दिव्य मिरवणूकेने दुपारी 2 वाजता आगमन होणार आहे.
असा हा भव्य-दिव्य सोहळा यशस्वी करण्याकरीता मंडळाला विविध कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे. त्यात आदित्य – अनघा मल्टीस्टेट को-आॅप. सोसायटी लिमिटेड, दि एकता महिला सहकारी संस्था, सुवर्ण महिला सहकारी संस्था, हॅवेल्स इलेक्ट्रीकल्स, तिरूपती बालाजी शिक्षण संस्था, वलोकार ज्वेलर्स अॅण्ड साडीस्, एव्हिस फिटनेस स्टुडियो, दत्तकृपा महिला को-आॅप. सोसायटी, गृहिणी प्राॅडक्टस, लिव्हरेज ग्रुप, रमेश ज्वेलर्स, राजसन्स हार्डवेअर इत्यादींचे प्रायोजकत्व लाभलेले आहे.
तसेच या उत्सवादरम्यान लहान मुलांच्या विविध स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी उखाणे स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन साबेतच विवीध सामाजीक उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच एक दिवस रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे. दि. 23 सप्टेंबरला सायं. 7 वाजता शिवस्वरूप् ढोलताशा पथकातर्फे 150 वादनांचे सादरीकरण होणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ब्ब्ज्ट कॅमेरे तसेच मेटल डिटेक्टर, अग्नीसुरक्षा यंत्र त्याच प्रमाणे 15-20 सुरक्षाकर्मी तैनात राहणार आहेत व मंडळाचे जवळपास 150 ते 200 महिला व पुरूष कार्यकर्ते भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज राहतील.
उपरोक्त उत्सवाकरीता मुर्तीकार राकेश पाठराबे , सजावट- श्रीकांत डेकोरेशन, (संदिप भुंबर, श्रीकांत तल्हार) सुमंगल डेकोरेशन व कलकत्ता, पुणे, भोपाळ व मुंबई येथून आलेले 50 कलाकार विद्युत व्यवस्था-बबलु इलेक्ट्रीकल्स- ध्वनी व्यवस्था- प्रशांत साऊंड सर्विस यांची आहे.
पत्रपरिषदेला संयोजक संजय चिंचोले यांनी संबोधित केले. या प्रसंगी राजेश श्रीमानकर, दिंगबरराव चावरे, मिलिंद जोशी, अखिल वलोकर, पल्लवी शिंदे, रूपेश मोहता, दिनेश चावरे, हृदेश दुबे, मंगेश वड्याळकर, मुकुंद सपकाळ, अनिल जोशी, प्रदीप वड्याळकर, राजकुमार गुप्ता रोहन बोरकर, इ. उपस्थित होते.
या गणेशोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे संजय चिंचोले, राजेश श्रीमानकर, मंगेश वडयाळकर, दिनेश चावरे,प्रकाश नेऊलकर, रोहन बोरकर, अॅड. पवन ढिमोले, रघु खोत, अमेय सैपूरिया, अनिल वाघ, अनिल जोशी, मुकुुंद सपकाळ, संजय सुंभाटे, कृपालसिंग मेहरोलिया, प्रदिप वडयाळकर, राजु गुप्ता, अनिल वलोकार, भुषण टोपरे, रूपेश गणात्रा, राहुल बोरकर, समीर वडयाळकर, आशिष बुधोलिया, सुनिल साऊरकर, कुणाल गडेकर, अखिलेश जाधव, गजानन शेंडे, बाळा मुंजे, राज खोत, महादेव हेडाऊ, हृदेश दुबे, हेमंत जोशी, प्रसन्न पाठक, हर्षल चावरे, नरेश आगलावे, अभिनव साउरकर, अनिकेत बुरले, अभिलाष सपकाळ, आदित्य सपकाळ, प्रतिक चंबोळे, मनिष जहागिरदार, अमन गुप्ता, सुनिल शेंडे, संदिप भुंबर, चंद्रशेखर पेशकर, प्रशांत आगलावे, सुनिल साऊरकर, निलेश अपराजित, बकुल श्रीमानकर, अखिलेश वलोकार, कुणाल बोरकर, अतुल खोत, राहुल साऊरकर, जितु उपाध्याय, सागर बोरकर, गोविंद सरोदे, प्रमोद मांडे, अमोल टोपरे, राजुभाई व्होरा, संजय पटवा, हरीश सपकाळ, दत्ता हिवसे, वैभव देवगडे, नरेश अग्रवाल, शेखर रावदेव, हिमंाशु गाडगे, शास्त्रकार, वैभव डेकाटे, मयंक जैन, अमन गुप्व्ता, तुषार धाबू, विजय मेंडजोगे, सचिन कावळे, विनोद कुळकर्णी , श्री धाबे, हिमांशु जाधव, सात्विक वितोंडे, जितेंद्र सोहम, रोहन सोहम, सौ. सोहम, अमोल कोटाल, जगदिश डबीर, विजय मेणजोगे, हरिष धोंडरकर, किरीट सावडिया, संजय राऊळकर, वल्लभ काळीकर, प्रसन्ना पाठक, राजु पत्राळे, सर्वेश पेशकर, चेतन मस्के, राजा राऊत चंद्रशेखर क्षीरसागर, राजेश झाम, मिलींद सपकाळ, राजू वितोंडे, निलेश भुसारी, राजेश संगतानी, सौ. रेखा बोरकर, सौ. लता खोत, सौ. पौर्णिमा जहागिरदार, सौ. सुरेखा चिंचोले, सौ. छाया लुले, सौ. कविता चावरे, सौ. शिला बोरकर, सौ. मनिषा खोत,सौ. कल्पना पोथी, निर्मला कुमेरिया, सौ. कविता इंगळे, सौ. अपर्णा टावरी, सौ. मंगला राऊळकर, सौ. सरोज पेशकर, सौ. निकिता आगलावे, रंजना काळीकर, सौ. हळदे, सौ. जोशी, सौ. साऊरकर, इत्यादी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
