
बुलढाणा- श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला आहे. त्याअनुषंगाने सकाळी ब्रम्हवृंदांच्या हस्ते विधीवत पूजन करून मंत्रोपचारात श्री गणेश याग व वरूण यागास आरंभ करण्यात आला आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संतनगरीत गावोगावच्या भजनी दिंड्यांचे आगमन होत असून जिकडे तिकडे भगवे पताकाधारी वारकरी व टाळ मृदुंगाचा गजर ऐकू येत आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सव निमित्ताने काकड आरती ,भजन ,प्रवचन व किर्तन महाप्रसाद हे कार्यक्रम नित्यक्रमाने सुरु आहेत. या उत्सवानिमित्त 16 सप्टेंबर पासून दररोज रात्री कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. यात शनिवारी ह. भ. प सुनील शिंगणे देऊळगाव मही यांचे किर्तन झाले. दि 21 सप्टेंबर ला ह.भ.प श्रीधरबुवा आवारे यांच्या कीर्तनाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल.