चिखलदरात चारचाकी दरीत कोसळून तेलंगाणातील चौघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

0
28

अमरावती, 17 सप्टेंबर   चिखलदरा पर्यटन स्थळावर जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाला सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान अपघात होऊन शंभर फूट खोल दरीत कोसळली. यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार अदीलाबाद,तेलंगाणा येथील ०८ युवक रात्री १२ वा. दरम्यान फिरण्या करिता अदिलाबादवरून चिखलदरा करिता वाहन मारूती अटिंगा क्रं.ए.पी.२८/ डी.डब्लु. २११९ ने निघाले होते, अमरावती ग्रामिण जिल्हयातील पो.स्टे. चिखलदरा हद्दीत आज सकाळी दरम्यान ग्राम मडकी कडुन चिखलदरा कडे जात असतांना धुक्यामुळे वाहन चालवित असतांना अनियंत्रीत झाल्याने वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन सरळ दरीमध्ये कोसळुन अपघात झाला असुन वाहनातील चालकासह चार जण मयत झाले आहेत.यात

१) शेख सलमान शेख चांद (२८, चालक), २) शिवा कृष्णा सुधरमा अदांकी (३१), ३) जी वैभव लक्ष्मणा गुल्ली (२९), तर जखमींमध्ये वाना पार्थी कोटेश्वर राव (२७), जी. श्यामसुंदर लींगा रेड्डी (३०), के. योगेश यादव (३०), के. सुमन काठीका आणि हरिष मुथिनेनी (२७) यांचा समावेश आहे.

अपघाताची माहीती मिळताच पो.स्टे. चिखलदरा येथील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी घटनास्थळावर धाव घेवुन जखमीना त्वरीत योग्य मदत पुरविण्यात आली आहे.

यातील सर्व जखमींवर उप-जिल्हा रूग्णालय, अचलपुर येथे उपचार सुरू असुन जखमींपैकी १) के. सुमन काठीका २) के. योगेश यादव, वय ३० वर्षे यांची प्रकृती गंभिर असल्याने त्यांना पुढील उपचारकामी वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा