मॅरेथॉन स्पर्धेत धावले आयटीआयचे शेकडो विद्यार्थी

0
15

अमरावती : कौशल्याला सन्मान व समृद्धी मिळावी तरुणांनी आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकासाकडे वळावे नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार निर्मिती करावी याकरिता आज राज्यातील 419 आयटीआय मध्ये पीएम रन फॉर स्किल ही पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हाभरातून आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.अमरावती येथील आयटीआय मधून या स्पर्धेला सुरुवात झाली असून पाच किलोमीटरची ही मॅरेथॉन स्पर्धा आहे यात प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके सुद्धा दिली गेली. या मॅरेथॉन स्पर्धेत आयटीआयच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा