
नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस तसेच विश्वकर्मा जयंती,योजनेनिमित्त नागपूर येथे पीएम स्किल रनचे आयोजन करण् यात आले. नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातून या रनला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय असून कर्मयोगी आहेत.आज त्यांचा जन्मदिवस आहे त्याचं औचित्य साधून स्किल डेव्हलपमेंट विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांमध्ये पीएम स्किल रनचे आयोजन केले. यांचा उद्देश कौशल्य विकास विभाग देशाच्या पुढच्या विकासाचा ड्रायव्हर आहे. लवकरच मोठी इंडस्ट्रियल मीटिंग ठेवण्यात आलेली आहे.कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करून त्यांना रोजगार द्यायचा आणि देशाला प्रगतीकडे न्यायचं अशा प्रकारचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2015 मध्ये मोदी यांनी कौशल्य विकास हे मंत्रालय सुरू केले त्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळावे आणि इंडस्ट्रियल बीडमध्ये तीन लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. यावर्षीचे उद्दिष्ट पाच लाखापेक्षा अधिक आहे. आज राज्यभर पाच लाखपेक्षा जास्त युवक -युवती या पीएम स्किल रन मध्ये सहभागी झाले आहेत यावर भर दिला.