ओबीसींचा उद्या निघणार मोर्चा

0
19

नागपूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी उद्या सोमवारी नागपुरात ओबीसी महामोर्चा निघणार आहे. आज पूर्वतयारीत ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, पुरुषोत्तम शहाणे,राजेश काकडे, अवंतिका लेकुरवाळे आदी सारे गुंतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतरही ओबीसी महासंघाने लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले. नागपुरातील मोर्चा सोमवारी 18 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता संविधान चौक या उपोषण मंडपापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. दरम्यान,माळी समाजातर्फे ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. दुसरीकडे आज रविवारी पूर्वनियोजित असा चंद्रपूर शहरातून ओबीसींचा भव्य महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये सर्वपक्षीय ओबीसी समाजातील नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चाचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात समारोप करण्यात आला. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार प्रतिभा धानोरकर , आमदार अभिजित वंजारी, किशोर जोरगेवार , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर, आदी प्रमुख नेत्यांसह हजारो ओबीसी नागरिक सहभागी झाले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा