बनवली 105 किलो चांदीची गणेशमूर्ती

0
16

 

खामगाव- राज्यातच नव्हे देशात खामगावला चांदीचे शहर (रजत नगरी) म्हणून ओळखले जाते. खामगावला रजत नगरीचा बहुमान मिळवून देण्यासाठी जांगिड कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. राजस्थान मधील रामगड येथील रहिवासी केशव रामजी जांगिड यांनी राजस्थानातून आल्यानंतर सन 1890 पासून शुद्ध चांदीच्या भांड्यावर आणि श्रम कौशल्याने कारागिरी करून ग्राहकांची मनं जिंकली. राजस्थानचे हस्तकला कौशल्य जपत रतन जांगिड , जगदीश जांगिड , राधेश्याम जांगिड आणि प्रदीप जांगिड यांनी मिळालेल्या वारशाला उंचशिखरावर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगावचे संचालक डॉ.कमल जगदीश प्रसाद जांगिड यांना महाराष्ट्र जन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. जांगिड कुटुंबियातील श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगाव येथे चांदीचे मंदिर ,चांदीचे दरवाजे , हनुमानाची आकर्षक मूर्ती , श्री लक्ष्मी नाणी इत्यादी शुद्ध चांदीचे संपूर्ण काम केले जाते. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे 31 किलो चांदीची श्री गणेशची मूर्ती तयार करून देण्यात आली होती. यंदा जालना येथील अनोखा गणेश मंडळाची चांदीची अंदाजे 105 किलो वजनाची श्री गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. या मूर्तीला 3 ते 4 महिने येथील कारागिरांनी अथक परिश्रम करून आपल्या कला कौशल्याने घडवली आहे. या आकर्षक मूर्तीची जालना येथील अनोखा गणेश मंडळ स्थापना करणार असल्याची माहिती डॉ. कमल जांगीड, संचालक, विश्वकर्मा सिल्वर हाऊस यांनी दिली.खामगाव- राज्यातच नव्हे देशात खामगावला चांदीचे शहर (रजत नगरी) म्हणून ओळखले जाते. खामगावला रजत नगरीचा बहुमान मिळवून देण्यासाठी जांगिड कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. राजस्थान मधील रामगड येथील रहिवासी केशव रामजी जांगिड यांनी राजस्थानातून आल्यानंतर सन 1890 पासून शुद्ध चांदीच्या भांड्यावर आणि श्रम कौशल्याने कारागिरी करून ग्राहकांची मनं जिंकली. राजस्थानचे हस्तकला कौशल्य जपत रतन जांगिड , जगदीश जांगिड , राधेश्याम जांगिड आणि प्रदीप जांगिड यांनी मिळालेल्या वारशाला उंचशिखरावर नेऊन ठेवले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगावचे संचालक डॉ.कमल जगदीश प्रसाद जांगिड यांना महाराष्ट्र जन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. जांगिड कुटुंबियातील श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगाव येथे चांदीचे मंदिर ,चांदीचे दरवाजे , हनुमानाची आकर्षक मूर्ती , श्री लक्ष्मी नाणी इत्यादी शुद्ध चांदीचे संपूर्ण काम केले जाते. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे 31 किलो चांदीची श्री गणेशची मूर्ती तयार करून देण्यात आली होती. यंदा जालना येथील अनोखा गणेश मंडळाची चांदीची अंदाजे 105 किलो वजनाची श्री गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. या मूर्तीला 3 ते 4 महिने येथील कारागिरांनी अथक परिश्रम करून आपल्या कला कौशल्याने घडवली आहे. या आकर्षक मूर्तीची जालना येथील अनोखा गणेश मंडळ स्थापना करणार असल्याची माहिती डॉ. कमल जांगीड, संचालक, विश्वकर्मा सिल्वर हाऊस यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा