OBC ओबीसी आरक्षणाला धक्का नाहीच-मुख्यमंत्री

0
17

 

मुंबई MUMBAI : मराठा समाजासाठी आरक्षणाच्या  MARATHA ARKSHAN मागणीवरून सरकारपुढे पीक निर्माण झाला असतानाच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे EKNATH SHINDE  यांनीही आज दिले. यापूर्वी Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणातून इतर कोणत्याही समाजाला वाटेकरी होऊ देणार नसल्याचे म्हटले होते.
आरक्षणाच्या मुद्यावर आता मराठा आणि ओबीसी समाज आंदोलन करीत आहेत. त्यामुळे राज्य सरकार समोरील पेच वाढला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. असे असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने ओबीसीमधून कोणत्याही समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार नसल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्याला आता मुख्यमंत्र्यांनी देखील दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, समाजाची दिशाभूल होता कामा नये. निजामकालीन कागदपत्रांमध्ये कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. अशा लोकांची माहिती मिळवली पाहिजे आणि खरच कुणबी असेल तर त्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण आहे तेवढेच ठेवून मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे ते आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, यासाठी सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा