सामाजिक आरक्षणाची कमाल मर्यादा वाढवा-काँग्रेस

0
9

हैदराबाद : सामाजिक आरक्षणाची कमाल मर्यादा वाढविण्यात यावी, असा ठराव काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हैदराबाद येथे काँग्रेस समितीची ही बैठक रविवारी पार पडली. आरक्षणाची कमाल मर्यादा वाढवल्याशिवाय राज्यामधील आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकत नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.
यासंदर्भात माहिती देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्यात यावी किंवा काढून टाकण्यात यावी. ही मर्यादा असल्यामुळे ठिकठिकाणच्या राज्यांमध्ये जे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लागू शकत नाहीत. ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याआधी देखील राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेजींनी आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, यासाठी सभागृहाच्या फ्लोअरवर मागणी केली होती, असेही त्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा