श्री गणेश स्थापना मंगळवारीच-ज्योतिषरत्न राजंदेकर

0
12

नागपूर : श्रीगणेशाची प्रतिष्ठापना उद्या १९ सप्टेंबर रोजीच करावी, असा निर्वाळा महाराष्ट्रीय पंचांगकर्ते ज्योतिषरत्न विद्या राजंदेकर यांनी दिला आहे. यावर्षी वर्षी भाद्रपद शु. ४ मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेशचतुर्थी आहे. संपूर्ण मध्यान्हव्यापिनी  ganesh chaturthi चतुर्थी तिथी याच दिवशी असल्याने श्रीगणेशाची स्थापना व पूजन याच दिवशी करावे, असे आवाहन त्यांनी केले आाहे.

यावर्षी गणेशचतुर्थीच्या तारखेवरून बरीच मतांतरे दिसत आहेत. मात्र, मंगळवार दि. १९ ला सूर्योदयापासून दुपारी १ वा. ४२ मिनिटांपर्यंत चतुर्थी तिथी आहे. धर्मसिंधू या प्रमाणग्रंथातील नियमानुसार दि १९ रोजी पूर्ण मध्यान्हकाळास चतुर्थी तिथी असल्याने याच दिवशी गणेशस्थापना करणे योग्य आहे. ही चतुर्थी मंगळवारी असल्याने अंगारक योग असून तो अधिक प्रशस्त आहे. यानुसारच आमच्या महाराष्ट्रीय पंचांगात तसेच दाते पंचांग, कालनिर्णय, निर्णय सागर, लाटकर, रुईकर पंचांच अशा जवळपास सर्व पंचागात १९ सप्टेंबरलाच श्रीगणेशचतुर्थी नमूद करण्यात आल्याचे राजंदेकर यांनी सांगितले. या दिवशी आपल्या कुळाचाराप्रमाणे श्री गणेशाची विधिवत् स्थापना, पूजन, महानैवेध करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा