सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

0
20

नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील शिंदे आणि उद्धव गटात eknath shinde uddhav thackerayसुरू असलेल्या वादाच्या संदर्भात दाखल याचिकांवर आज सुनावणी होत असून त्यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह (धनुष्यबाण) वापरण्यास परवानगी देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर देखील ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली असून त्यावरही निर्णय अपेक्षित आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या‌ याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याविरोधात दाखल याचिकेबाबतही सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने सुनावणीअंती पक्ष व चिन्हावर शिंदे गटाचा दावा मान्य केला होता. त्याला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभेच्या अध्यक्षांकडे निर्णयार्थ सोपविला होता. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेत नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. न्यायमूर्ती बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा