संगमनेरमध्ये ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

0
10

 

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ गावच्या ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाच्या जाचाला कंटाळून संतप्त ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतलाच टाळे ठोकले आहे. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेवकावरती अडीच लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे. संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई होऊन त्याला शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.जोपर्यंत ह्या मुजोर ग्रामसेवकांवर कारवाई होणार नाहीत तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कोणालाही उघडू देणार नाही असा पवित्रा खंदरमाळ गावच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा