कोकणात गणपती बाप्पाचे थाटात आगमन

0
13

 

रत्नागिरी – कोकणात मोठ्या भक्तीभावाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत.सध्या जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून आज आपल्या लाडक्या बाप्पाचे घरी आगमन झाले. रत्नागिरीजवळ असलेल्या कार्ला व आंबेशेत या दोन गावांची एकत्रितपणे गणेशमूर्ती घेऊन जाण्याची ३८ वर्षांची परंपरा यावर्षीही जपली जात आहे.या दोन गावातील गणपती ढोल – ताशांच्या गजरात वाजत गाजत भजन म्हणत,नृत्याचा ठेका धरत दरवर्षी अशाच पद्धतीने एकत्र नेले जातात.भक्तिमय वातावरणात
जल्लोष करत या गणेशमूर्तीची मिरवणूक काढली जाते.या मिरवणुकीची चर्चा फक्त शहरांतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात होताना पाहायला मिळते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा