एक ऑक्टोंबरपासून जनसंवाद यात्रा

0
19

सोलापूर 19 सप्टेंबर: भोळ्या बाभड्या जनतेला अनेक प्रकारचे आश्वासने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात येत्या एक ऑक्टोबर पासून जनसंवाद यात्रा काढणार आहे. जनतेला पद्धतशीरपणे फसवणाऱ्या भाजपच्या कुटनितीचा भांडाफोड या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जाहीर केले. अक्कलकोट येथील कॉंग्रेस कमिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी म्हेत्रे म्हणाले की, सरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे गोरगरीब जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शंभर दिवसांत महागाई कमी करणार असे खोटे आश्वासन मोदींनी दिले होते. गॅसच्या वाढत्या किमतीमुळे घराघरातील महिला त्रस्त आहेत. सत्तेचा गैरवापर सुरु असून, सरकार विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मणिपुर प्रकरणामुळे घराघरातील महिला असुरक्षित झाल्या आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा