नवीन संसद भवनाची देशाच्या इतिहासात मोलाची भूमिका – खा तुमाने

0
18

नागपूर . मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी काश्मिरची राजधानी श्रीनगर येथे गणेशाची प्रतिष्ठापना करून तर पंतप्रधान मोदी यांनी नवीन संसद भवनात प्रवेश करून इतिहास घडविला आहे. या घटनेचा साक्षीदार होण्याचे सौभाग्य मला मिळाले असून नवीन संसद भवन देशाच्या इतिहासात मोलाची भूमिका घडवेल असा विश्वास रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला. आज श्रीगणेशाची कुटुंबातील सर्व सदस्यांनी पूजा केली.
गणेशोत्सवाला सामाजिक प्रबोधनाची गौरवशाली परंपरा आहे. नागरिकांनी एकसंघ होऊन भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.आपली संस्कृती, परंपरा व सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या उत्सवाने निरंतर केले आहे, हीच परंपरा कायम रहावी अशी अपेक्षा खासदार तुमाने यांनी श्रीगणरायांच्या चरणी बोलून दाखविली. यावेळी खा. कृपाल तुमाने यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. रेवती, मुलगा गौरव, मुलगी हिमांशी, त्यांचे ज्येष्ठ बंधु डॉ. कोडेश्वर तुमाने, वहिनी कल्पना, पुतण्या जयेश व गार्गी तुमाने उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा