
नागपूर :आजचा दिवस एतिहासिक असून नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले. १४० कोटी भारतीयांसाठी नवे संसद भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे. महिला आरक्षणाबाबत विधेयक मांडून नवा इतिहास पंतप्रधान मोदी यांनी घडविला. हे विधेयक मंजूर झाल्यावर देशातील निम्म्या संख्येत असलेल्या महिलांना ३३% आरक्षण मिळेल व त्या देखील देशाच्या जडण-घडणीत हातभार लावतील असा विश्वास चंद्रशेखर बावणकुळे त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसचे काम संभ्रम निर्माणाचे!
मराठा आरक्षण देताना सर्वपक्षीय बैठकीत ओबीसींचे आरक्षण कुठेही कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. ओबीसी महासंघाच्या मोर्चाला भाजपाचा सुरुवातीपासून पाठिंबा होता, त्यामुळे त्यात कुणी घुसले आणि फुट पाडली असा आरोप करणे चुकीचे आहे. त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. नाना पटोले आणि कॉंग्रेसला जनतेला समजून सांगता येत नाही, त्यामुळे ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
