विरोधीपक्षाला न विचारता अधिवेशन घेणे भयावह – नाना पटोले

0
11

 

नागपूर – गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीची देवता आहे, सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. राज्यात दुःखी लोक अधिक आहे ते सुखी व्हायला हवेत. शेतकरी आणि तरुणाईचे प्रश्न सुटायला पाहिजे. महिला बिल येणार अस मला तरी वाटत नाही. कॅबिनेट मध्ये चर्चा झाली त्यातली नोट दिसत नाही. विशेष अधिवेशनाची भूमिका अजून स्पष्ट नाही विरोधीपक्षाला न विचारता अधिवेशन घेणं हे भयावह आहे. नवीन संसदेत अधिवेशन घेण्याचा मुख्य उद्देश काय हे कोडेच असल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलून दाखविली आहे .
पटोले म्हणाले, ओबीसीच्या मोर्चा, आंदोलनात कालचे चित्र मी पाहिले. त्यात भाजपचेच नेते आंदोलन करत आहे असं चित्र होतं, हे लोक सत्तेत असताना सरकार विरोधात आंदोलन करत आहेत का हा प्रश्न आहे. हा लपाछपीचा खेळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपविला पाहिजे असा संभ्रम ठेवून हे लोक मराठा आणि कुणबी समाज समोरासमोर आणत आहेत. मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करू इच्छित आहेत असा आरोपही केला. ओबीसी महासंघ आंदोलनात कायम असून बबनराव तायवाडे हे प्रामाणिक नेते आहेत. ते चांगलं काम करत आहेत. मुळात ओबीसी आंदोलन हा राजकीय विषय होऊ शकत नाही, मी विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसी सेन्सेक्सचा विषय मी आणला.खूर्चीचा वापर समाजासाठी आणि पीडितांसाठी व्हावा ही कॉंग्रेसची भूमिका आहे .मी आंदोलन केले तर लाखो लोक आंदोलनात आणू शकतो असा दावा केला. शेड्युल 10 नुसार आमदार अपात्र प्रकरणी कारवाई व्हायला हवी. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुप्रीम कोर्टात अपिट्युड करून दिले होते. राहुल नार्वेकर यांनी ही प्रक्रिया लांबविली आम्ही त्यावर हरकत घेतली. त्याच प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. प्रथा, परंपरा, लोकशाहीच्या संकेताचं पालन व्हायला पाहिजे. वेगळा विदर्भ झाल्यास तो विदर्भासाठी नाही तर मुंबईत त्यांना घेऊन जायचंय त्याच्यासाठी होईल. संसद अधिवेशनात काय चमत्कार होईल हे पाहतोय. दिवसाढवळ्या काय होणार हे पाहावं लागेल. भाजप प्रणित व्यवस्थेत जबरदस्ती आणलेले लोक जे ईडी, सीबीआयच्या धाकाने आणले यांचं महत्व किती हे अधोरेखित काही नेते करत आहेत.2014 पासून राज्यात पर्सनल अजेंडा घेऊन व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत. सगळ्यांना सद्भुद्धी दिली पाहिजे. आज गणेशाची स्थापना झाली. दिल्लीचे हस्तक बनून काम करण्यापेक्षा जनतेसाठी काम करावे, सत्ताधाऱ्यानी अशी अपेक्षा बोलून दाखविली.
देशात चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यामध्ये काँग्रेसचे भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा समावेश आहे यावर पटोले यांनी भर दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा