भारत आणि कॅनडात निर्माण झाला तणाव

0
18

नवी दिल्ली-भारत आणि कॅनडात राजकी तणाव निर्माण झाला आहे. कॅनडामध्ये जून महिन्यात खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाने केला आहे. हा आरोप करीत कॅनडाने देशातील भारताच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केल्याने तणाव निर्माण झाला आहे. तर भारताने ही कॅनडाला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली आहे. (India expels top Canadian diplomat) कॅनडाने केले आरोप भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत.
कॅनडा सरकारने सातत्याने तेथील खालिस्तानी समर्थकांना पाठिंबा दिला आहे. खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याची जून महिन्यात कॅनडाच्या सरे शहरात हत्या करण्यात आली. एका पार्किंगमध्ये त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या व त्यात मृत्यू झाला.या प्रकरणावरून कॅनडाने भारताकडे आपली नाराजी बोलून दाखवली होती तर भारताने देखील कॅनडाचे आरोप त्यावेळीही फेटाळून लावले होते. आता कॅनडाने भारतीय उच्चायुक्तांवर कारवाई केल्याने तणावात भर पडली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा