राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन कायमच – बबनराव तायवाडे

0
9

 

नागपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सुरू असलेले ओबीसी आंदोलन अजूनही संपलेले नाही. कुणी एक माणूस हे आंदोलन मागे घेऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. आतापर्यंत सोबत असलेल्या कुणबी कृती समितीने काय निर्णय घेतला तो त्यांचा निर्णय आहे, असेही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले. काल कुणबी कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांनी हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली होतो. तायवाडे आंदोलनावर ठाम होते, आज तायवाडे म्हणाले,जोपर्यंत सरकार आम्हाला चर्चेला बोलवत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. सर्व जातीय संघटना या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नागपूर येथे आणि राज्यभर सुरू असलेले आंदोलनात सहभागी असल्याचे बबनराव तायवाडे म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा