शैक्षणिक धोरणाविरुद्ध लवकरच आंदोलन!

0

 

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणविरोधात आंदोलन करण्यासंदर्भात समन्वय समितीची विभागीय बैठक महिला महाविद्यालय, नागपूर येथे २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष रवींद्रजी फडणवीस, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळ हे होते. तसेच या बैठकीला नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर आडबले , माजी शिक्षक आमदार नागो गाणार, महामंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिलजी शिंदे, कार्यवाह किशोरजी मासुरकर, अशोकजी जीवतोडे, विजुक्तटा चे विभागीय कार्यवाह प्रा. अशोक गव्हाणकर,शिक्षक परिषद नागपूर विभाग कार्यवाह
शिक्षकेतर कर्मचारी संघटना विभागीय अध्यक्ष आष्टीकर, महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांतजी खणके, आल्हाद भांडारकर, गोंदिया जिल्हा संघटनेचे आर. एस. कापगते व इतर सभासद उपस्थित होते.
बैठकीमध्ये १) जिल्हास्तरावर सगळ्या संघटनेची समन्वय समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून दिनांक १ ते ६ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांना निवेदन देणे.
२) जिल्हामध्ये आंदोलन करणे.
३) जिल्हास्तरीय मोर्चा काढणे.
४) हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेवर मोर्चा काढून आपल्या मागण्याचे निवेदन देणे.
या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सगळयांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा