मुंबई : सेंच्युरी कंपनीतील स्फोटात 5 जणांचा मृत्यू

0

 

 

मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबईच्या उल्हासनगर भागात सेंच्युरी कंपनीतील सीएस-2 डिपार्टमेंटमध्ये मोठा स्फोट झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना सेंच्युरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तसेच बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

यासंदर्भात प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट इतका भीषण होता की तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर परिसरातील घरांना हादरे बसले आहेत. यानंतरच ही सर्व घटना समोर आली. सध्या पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.उल्हासनगरमध्ये सेंच्युरी ही कंपनी आहे. या कंपनीत दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक ब्लास्ट झाला. हा ब्लास्ट झाल्यानंतर काही क्षणात आग कंपनीच्या इतर भागात पसरली. त्यामुळे कामगारांमध्ये एकच धावपळ उडाली. या स्फोटात 5 कामगार दगावल्याची माहिती आहे. ब्लास्टच्या आवाजामुळे आसपासच्या परिसरातील लोकही घराबाहेर पळाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा