NAGPUR नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक भागात शिरलं पाणी

0

नागपूर: रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शेकडो घरात पाणी शिरले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे ३ वाजता ही घटना घडली rain update 

शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. रात्री पावसाची तीव्रता अधिक वाढली. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. तलावाच्या एका टोकाला असलेल्या विवेकानंद पुतळ्याजवळ तलावाचा विसर्ग पॉईंट आहे. तेथून वेगाने पाणी प्रथम रस्त्यावर आणि नंतर रस्त्यालगतच्या अंबाझरी लेआऊटमधील घरात शिरले. रात्री ३ ते ३:३० च्या सुमारास परिसरात एकच वस्तीमध्ये एकच गोंधळ उडाला. याच वस्तीत अंधाची शाळा आहे.तेथे पाणी शिरले. मुलांना पहिल्या माळ्यावर हलवण्यात आले.

नागपुरात कोसळत असलेल्या पावसाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आढावा घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली, असे फडणवीस यांनी सांगितले.नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.” असेही फडणवीस म्हणाले.

अंबाझरी तलावाचे पाणी रस्त्यावर

 

विजांच्या कडकडाटाने
इमारती थरथरल्या

मध्यरात्रीची वेळ…पाऊस आधीच सुरू झालेला. घड्याळातील काट्यांनी साडेतीन चा टप्पा पार केला असेल बहुधा अन् वर आकाशात ढगांचे तांडव सुरू झाले. काळजी घेण्याचा भाग असेल कदाचित, पण इकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने अर्धे शहर अंधारात होते. अशात चमकणाऱ्या वीजांचा लखलखाट अन् त्याच्या कडकडाटाने आसमंत व्यापून टाकला होता. जणूकाय, युद्ध गर्जना सुरू असाव्यात, अशा थाटात चाललेल्या या कडकडाटाने साखरझोपेत असलेल्या अनेकांना अक्षरशः जागे केले. शहरातील उंच इमारतींनी या आवाजाच्या प्रचंड तीव्रतेमुळे थरथरण्याचा अनुभव घेतला. अगदी भूकंपासारखा… इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कित्येक लोकांसाठी तर हा अनुभव अंगावर सर्रकन काटा उभा करणारा होता. पावसाळ्यात कधीतरी वीजा कडकडण्याचा प्रसंग कुणालाच नवखा नाही. पण, सतत दीड-दोन तासांच्या कालावधीत आकाशात चाललेल्या मेघगर्जना , काळोखात चमकणाऱ्या विजांचा लखलखाट, हादरवून सोडणारा एक आवाज संपत नाही तोच ढगांचा दुसरा, तिसरा, चौथा…असा लागोपाठचा आवाज…हा अनुभव नवीनच होता अनेकांसाठी…भीती निर्माण करणारे ढगांचे एकमेकांवर आदळणे नियंत्रणात आले, आकाशातील आवाजाचे हे सत्र थांबायला झाले, तेव्हा जवळपास उजाडण्याची वेळ झाली होती….

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा