
बुलढाणा BULDHANA : ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील निवृत्ती झिने ,वय 38 असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकरी काल संध्याकाळी शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला.देव्हारी गावचे रहिवासी असलेले सुनील झिने यांची अभयारण्याच्या सीमेवर शेती आहे. शेतात काम करीत असतांना मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला, परंतु तो अपुरा पडला.सुनीलच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन आसपासच्या शेतीतील माणसे घटनास्थळी धावली. त्यांनी बिबट्याला पिटाळून लावले.मात्र तोपर्यंत झिने यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर वन्यजीव अधिकारी यांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली.