शिवसेनेसोबत दगा फटका झाला तर महाराष्ट्र भाजपला माफ करणार नाही!

0

 

बुलढाणा – राज्यातील 16 आमदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार असल्याच्या प्रश्नावरून आमदार बच्चू कडू यांनी भाजपला इशारा दिला होता. मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिल्यानंतर आता बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील भाजपला इशारा दिला आहे. भाजप- शिवसेनेची नैसर्गिक युती असताना शिवसेनेसोबत दगा फटका झालाच तर भाजपला महाराष्ट्र कधी माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा