
आष्टी तालुक्यात पावसामुळे दहा गावांचा संपर्क तुटला
बीड : बीडच्या आष्टी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यातील बाबी गावासह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसात डोईठाण येथील पूल वाहून गेल्याने जवळपास दहा गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात 6 शेळ्या वाहून गेल्यात. दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानं नदीला नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शेतात गेल्याने खरिपाची पिकं देखील धोक्यात आली आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा