पंकजा मुंडे महाराष्ट्रात फिरत असल्यामुळेच कारवाई – आ बच्चू कडू

0

 

अमरावती- बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्यांनी सत्तेतून संविधान लिहिलं असते तर ती घटना वेगळी असती. बाबासाहेबांचा मोठा संघर्ष आहे. या संघर्षातूनच त्यांनी संविधान लिहिल्याचे मत आ बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राज्यात यात्रा काढली आणि त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई सुरू झाली. त्या महाराष्ट्रात फिरल्या त्यामुळे कारवाई सुरू झाली असेल.खा श्रीकांत शिंदे हे भाजपाच्या तिकीटवर लढणार असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. आ रोहित पवार भविष्य व्यक्त करत आहेत, मला नवलचं वाटत आहे. ते तर नेहमी भविष्याच्या विरोधात असतात.
वारे गुरुजी संदर्भात बोलताना कडू म्हणाले, वारे गुरुजींना मी पाठिंबा दिला होता. तेव्हा स्थानिक आमदार आणि तेव्हाचे पालकमंत्री त्यानी त्याचं निलंबन करण्यासाठी पाठपुरावा केला होता. वारे गुरुजींवर वार करणे चुकीचे होते. चांगल्या गुरुजींसोबत आम्ही उभे राहणार, जे काम करत नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा