‘एसआरपीएफ’ जवानाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

0

नागपूर NAGPUR : वाहन पार्क करताना झालेल्या वादात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने एक ५४ वर्षीय व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली. वाठोडा पोलिस हद्दीतील माता मंदिर परिसरात जवानाने कारच्या हेडलाइटवरून झालेल्या वादात एका ५४ वर्षीय व्यक्तीला चापट मारली. यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आरोपीचे नाव निखिल गुप्ता ( वय ३०) असे आहे. तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी कारने परिसरात आला होता. गुप्ता त्याची कार पार्क करत असताना त्याच परिसरातील रहिवासी मुरलीधर रामरावजी नेवारे यांच्या चेहऱ्यावर कारचा हेडलाइटचा प्रकाश पडला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाची होऊन गुप्ताने नेवारे यांना जोरदार चापट मारली. त्यामुळे नेवारे जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले मात्र शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुप्ता विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा