जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी

0

 

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने आज दुपारपासून जोरदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे भात पिकाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विजेच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आले आहे. ज्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. हा पाऊस भात पिकांसाठी फायदेशीर असला तरी हलक्या धान पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसणार आहे. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा