पंकजा मुंडेंना धक्का!

0

परळी PARLI – भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Co-operative Sugar Mill) केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली आहे. (BJP Leader Pankaja Munde) कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात कारखान्यावर छापेमारी झाली होती. राजकीय वर्तुळात या कारवाईची चर्चा आहे.

पंकजा मुंडे या अध्यक्ष असलेल्या या कारखान्याने १९ कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजनगरमधील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती. तर कारखान्यातील कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेले एक पत्रक जीएसटी विभागाकडून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. या कारवाईवर अद्याप पंकजा मुंडे यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा