
मुंबई : आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभेच्या अध्यक्षांपुढे सुनावणी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित परदेश दौरा पुढे ढकलण्यात आला आहे (Hearing on MLA Disqualification petition). दौऱ्याची पुढची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत (CM Eknath Shinde on Foreign Tour) हे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसह १ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि जर्मनीच्या दहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी आणि इतर खासगी कारणांच्या पार्श्वभूमीवर या दौरा लांबणीवर टाकण्यात आलाय. विरोधकांनी या दौऱ्यावर टीका केली होती. हा दौरा दावोससारखा सहलीचा दौरा ठरु नये, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. दावोस दौऱ्याचा खर्चाचा खरा आकडा सरकार अजूनही लपवत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.