
हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतंच ट्वीट करत ही घोषणा केली. हिंदी मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा
अनुराग ठाकूर यांनी केलेलं ट्वीट

अनुराग ठाकूर ट्वीट करत म्हणाले की, मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की. भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल वहीदा रहमान यांना यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
वहीदाजींनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘प्यासा’, ‘कागज के फुल’, ‘चौधवी का चाँद’, ‘साहेब बिवी और गुलाम’, ‘गाईड’, खामोशी सह अनेक चित्रपटांमध)्ये काम केलं आहे. ५ दशकांच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी सर्वोच्च काम करत राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. रेश्मा आणि शेरा सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळाल होता. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त वहिदा जी यांनी समर्पण, वचन बद्दता आणि भारतीय नारीच्या ताकदीचे उदाहरण दिलं आहे. जी तिच्या कष्ट आणि परिश्रमाने व्यावसायिक श्रेत्रात उत्कृष्ट कामगिरी कुर शकते.
मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो जो आमच्या चित्रपट इतिसाहाचा अंगभूत भाग आहे.
सन्मान जाहीर करण्यात आला आहे.