
राज्य माहिती आयुक्तालयातर्फे २९ सप्टेंबर रोजी
(Nagpur)नागपूर,दि.25 : माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा राज्यात लोकाभिमुख झाला असून या कायद्याचे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘माहिती अधिकार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने येथील राज्य माहिती आयुक्तालयात शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येत आहे.
जूने सचिवालय परिसरातील नवीन प्रशासकीय भवन, पहिला माळा येथे ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस’ विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थिती साजरा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (Information Commissioner Rahul Pandey)माहिती आयुक्त राहुल पांडे राहणार असून मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘माहितीचा अधिकार जनतेचा अधिकार’ याअंतर्गत नागपूर विभागात सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन, इमारत क्रमांक दोन, पहिला माळा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन (State Information Commissionerate Deputy Secretary Rohini Jadhav)राज्य माहिती आयुक्तालयाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी केले आहे.