
चारही कर्मचाऱ्यांना केले निलंबित
(Buldhana)बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मुलींना अळ्या असलेले अन्न, सडलेल्या भाजीपाला खायला घालणाऱ्या वॉर्डन स्मिता जोशींविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात विविध कलमासह एट्रासिटी गुन्हा ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली शहरातील मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना अळ्या असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्याने 6 मुलींना विषबाधा झाली होती. या प्रकरणी विषबाधा झालेल्या 6 मुलींपैकी एका मुलीने पोलिसांत तक्रार दिली, मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ जेवण देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु तसे त्यांनी केलेले नाही, त्यामुळे तेथील एक स्वयंपाकीन आणि दोन मदतनीस यांना निलंबित केलेले आहे. तसेच गृहपाल जोशी त्यांना सुद्धा शासनाने निलंबित केलेले आहे. अशा प्रकारे प्रशासनाने चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती (Social Welfare Assistant Commissioner Dr. Anita Rathore)समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिली.