समीर भुजबळ होणार राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची समीर भुजबळ यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे (Ajit Pawar Fraction of NCP). प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. तटकरे यांनी जबाबदारी समीर भुजबळ यांच्याकडे दिली जाणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

अजित पवार गटाच्या दुपारी होणाऱ्या बैठकीत समीर भुजबळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Nawab Malik)नवाब मलिक हे वैद्यकीय कारणास्तव बाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवे अध्यक्ष नेमत आहोत. (Sameer Bhujbal)समीर भुजबळ यांना आम्ही जबाबदारी देणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले.

वैद्यकीय कारणास्तव कारागृहातून बाहेर आलेले नवाब मलिक हे वैद्यकीय कारणास्तव सध्यातरी पक्षकार्यात सक्रीय नाहीत. त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदी दुसऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सुरु होती. या पदासाठी मुंबईतून शिवाजीराव नलावडे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा