संगम तलावाची खचली भिंत

0

 

(Buldhana)बुलढाणा– बुलढाणा शहरातील इंग्रज कालीन असलेल्या संगम तलावाची मातीची भिंत मोठ्या प्रमाणात खचल्याने संगम तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे, सध्या खचलेल्या भिंतीतून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे,तलाव परिसरात जोरदार पाऊस पडल्यास तलावाची भिंत पूर्णपणे कोसळून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग मोठी दरीच्या माध्यमातून पलढग धरणात होण्याची भीती निर्माण झाली आहे, यानिमित्ताने संगम तलावाबाबत बुलढाणा नगर परिषदेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

दरम्यान, याच संगम तलावात नगर परिषदेने गणेश विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे.यामुळे याठिकाणी मोठी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या तलावात लाखो लिटर पाण्याचा साठा असून तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील वाढलेली आहे..दरम्यान संगम तलाव संवर्धनासाठी बुलढाणा नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च याठिकाणी केला गेलाय,मात्र तलावाच्या माती भिंती दुरुस्तीवर कुठल्याच प्रकारचा खर्च करण्यात आलेला नसल्याने यामुळे ही माती भिंत खचल्याचे बोलले जाते.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा