“उबाठा म्हणजे थुंकलेली सुपारी..

0

नितेश राणे

(Mumbai)मुंबई-शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु असून यात आता पातळी सोडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाने भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष असल्याची टीका केली तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार करताना “तुमचा उबाठा गट म्हणजे शरद पवारांनी थुंकलेली सुपारी आहे” अशी टीका केली आहे. (BJP MLA Nitesh Rane )

(Shivsena)शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. पण गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय? असी टीका मुखपत्रात करण्यात आली होती. त्याला भाजपने उत्तर दिले आहे. आमदार नितेश राणे म्हणाले की, काँग्रेसला काही बोलले की राऊत यांना लाल व हिरव्या मिरच्या झोंबतात. आता ठाकरेंचे मुखपत्र काँग्रेसचे मुखपत्र बनले आहे, असेही ते म्हणाले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा