डिजेच्या आवाजाने काय विपरीत घडले ?

0

(Sangli)सांगली : डीजेच्या दणदणाटाने मृत्यू ओढवू शकतो का, असा प्रश्न सांगली जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनांमुळे निर्माण झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजामुळे दोन तरुणांना मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील (Shekhar Pavshe) शेखर पावशे (वय 32) आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथील (Praveen Shirtode)प्रवीण शिरतोडे (वय 35) अशी या तरुणांची नावे आहेत. डीजेच्या आवाजामुळे या दोघांना अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दुधारी येथील प्रवीण शिरतोडे हा तरुण परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने मिरवणुकीत सामील झाला होता. तत्पूर्वी त्याची बाईक बंद पडल्याने ती बराच वेळ ढकलत आणावी लागल्याने तो थकलेला होता. अशातच डीजेच्या प्रचंड आवाजाने त्याला अस्वस्थ व्हायला लागले. मित्रांसोबत नाचत असतानाच त्याला चक्कर आली व तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसरी घटना कवठेएकंद येथील असून येथील शेखर पावशे या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील डीजेच्या तीव्र आवाज सहन न झाल्याने ह्रदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दहा दिवसांपूर्वीच त्याच्या ह्रदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. विसर्जनच्या मिरवणुकीत डिजेच्या बॉक्सचे थर चढवून गाणी वाजवली जात होती, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा