
बुलढाणा – मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसानिमित्त जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सव मुस्लिम समुदायांकडून आज मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. बुलढाणा शहरातून जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सवानिमित्त मोठ्या आनंदात व जल्लोषात जुलूस काढण्यात आला. इंदिरा नगर येथून या जुलूसची सुरुवात होवून संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौकमार्गे ल हा जुलूस इकबाल चौक, टिपू सुलतान चौकात पोहचला. त्यानंतर समारोप इकबाल चौकात करण्यात आला.डी. जे. मधील कव्वालीच्या गजरात, समाजाचे झेंडे फिरवत जुलूस मध्ये लहान, मोठे, युवक आणि वयोवृद्धांनी सहभाग नोंदविला.दुसरीकडे आज गणेश विसर्जन असल्याने बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सवानिमित्त काढण्यात येणारा जुलूस उद्या काढण्यात येणार आहे.