बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

0

 

नागपूर NAGPUR दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला शहरात ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करीत पुढल्या वर्षो लवकर या… अशी विनवणी करीत निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे आज पावसानेही हजेरी लावली. दहा दिवस उत्साहाच्या वातावरणानंतर आज लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या, असं आबालवृद्धांनी साकडं घालत निरोप दिला. घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी नागपूर मनपा प्रशासनाकडून ठिकठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्यात आले. जलप्रदूषण टाळण्यासाठी अशा पद्धतीचे सुमारे 400 कुंड हे शहरातील 10 झोनमध्ये तयार करण्यात आले आहेत. कोराडी येथील तलावात विसर्जनासाठी जात असलेल्या तुळशीबाग येथील नागपूरचा राजा गणेशाची विसर्जन मिरवणूक दुपारी सुरू झाली. श्री विसर्जन दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त, राज्य राखीव दल, होमगार्ड त्यासोबतच अग्निशमन दलाचे पदाधिकारी ठिकठिकाणी तैनात आहेत. अनंत चतुर्दशी असल्याने आज बहुतांशी घरगुती गणेशमूर्ती काही सार्वजनिक मंडळांचे तर उद्या भाद्रपद पौर्णिमा असल्याने इतर मंडळांचे गणेश विसर्जन होणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा