
बुलढाणा- दहा दिवसाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सर्वच ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे 28 गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. त्यामध्ये मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व विशेष देखावे सादर केले होते. तर आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशी निमित्ताने विसर्जन मिरवणुकीला सकाळी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या याची कोटी मानाचा लाकडी गणपती निघाल्यानंतरच खामगाव शहरातील मंडळे गणपती मागे पोलिसांनी काढलेल्या लकी ड्रॉ नुसार मिरवणुकीमध्ये सामील होत असतात.यावर्षी शिवाजीनगर येथील तानाजी व्यायाम शाळा गणेश मंडळाच्या वतीने आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन व त्यांचे नृत्य तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध अभंग, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, हनुमान मंडळाच्या वतीने झांज पथक मल्लखांब, तसेच इतर मंडळांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात देखावे सादर केले आहेत. आमदार आकाश फुंडकर, अध्यक्ष तानाजी व्यायाम शाळा उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील अनेक ग्रामस्थांनी वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीवर गणपती विसर्जन मोठ्या थाटात केले. यावेळेस यशोदा नदीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन करण्यात आले.

गणेश विसर्जन करून येताना ॲपेला ट्रकची धडक व आग
बुलढाणा- नागपुर मुंबई राष्ट्रीय महामार्गवरील खामगाव येथील जनुना तलाव येथून गणेश विसर्जन करून शहरात परत येताना जनुना चौफुल्ली वर अकोलाकडे जाणाऱ्या भरभाव ट्रक ने ॲपेला जोरदार धडक दिली या धडकेत आग लागल्याने ॲपेमधील गणेश मंडळाचे काही लोक हे जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले होते.गाडीतील फायर पंप नादुरुस्त असल्याने आग विझवण्यास वेळ लागला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. ट्रकमधील साबण जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या दुसऱ्या गाडीस पाचारण करण्यात आले त्यानंतर पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आली.