राज्यभरात गणेशविसर्जन मिरवणुकांची धूम

0

नागपूर NAGPUR -दहा दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणपतीबाप्पाला निरोप देण्याचा दिवस आला असून राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धूम आढळून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह सर्वच ठिकाणी मोठाल्या मिरवणुका सुरु झाल्या असून भक्त साश्रुनयनांनी आपल्या बाप्पाला “पुढच्या वर्षी लवकर या” ची विनवणी करत निरोप देत आहेत. ganpati festival 2023 

उपराजधानी नागपुरात गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महानगर पालिकने ठिकठिकाणी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था केली आहे. नागपुरात गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस गणेश विसर्जन चालणार आहे. दरम्यान, मुंबईतही गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठी गर्दी आहे. सकाळी अकराच्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पुण्यातही सकाळी साडेदहा वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत विसर्जनाच्या मिरवणुका चालणार आहेत. त्यामुळे राज्यभरात पोलिस यंत्रणेवर बंदोबस्ताचा मोठा ताण राहणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा