“असं पुन्हा घडल्यास गालावर वळ उठतील” -राज ठाकरे

0

मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात असे पुन्हा घडल्यास गालावर वळ उठतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबईत तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने मुलुंडमधील एका इमारतीत ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या प्रकरणात तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात बोलतान राज ठाकरे म्हणाले, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असे काही घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित. सरकारने देखील जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा